मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pune Rain : परतीच्या पावसानं पुण्याला झोडपलं, रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक कोलमडली, पाहा PHOTOS

Pune Rain : परतीच्या पावसानं पुण्याला झोडपलं, रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक कोलमडली, पाहा PHOTOS

Oct 15, 2022 10:31 AM IST Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • twitter

  • Pune Rain Update : परतीच्या पावसानं पुण्यात धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळं शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.

Heavy Rains In Pune : परतीच्या पावसानं राज्यातील अनेक भागांत थैमान घातलं आहे. पुणे शहरातही झालेल्या मुसळधार पावसानं पुणेकरांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

Heavy Rains In Pune : परतीच्या पावसानं राज्यातील अनेक भागांत थैमान घातलं आहे. पुणे शहरातही झालेल्या मुसळधार पावसानं पुणेकरांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.(HT)

पुण्यातील मुसळधार पावसामुळं फर्ग्युसन कॉलेज रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. याशिवाय गुडलक चौकातील पावसाच्या पाण्याचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

पुण्यातील मुसळधार पावसामुळं फर्ग्युसन कॉलेज रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. याशिवाय गुडलक चौकातील पावसाच्या पाण्याचा एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(HT)

शहरात मुसळदार पाऊस झाल्यानं एफसी रस्ता, जंगली महाराज रस्ता, विद्यापीठ चौकासह अन्य भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

शहरात मुसळदार पाऊस झाल्यानं एफसी रस्ता, जंगली महाराज रस्ता, विद्यापीठ चौकासह अन्य भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.(HT)

याशिवाय शिवाजी नगर, संगमवाडी, येरवडा, टिळक रस्ता, आपटे रस्ता आणि पेठांच्या भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. शहरातील अनेक भागांमध्ये दीड ते दोन तास पाऊस झाल्यानं शहरवासियांची चांगलीच धावपळ उडाली.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

याशिवाय शिवाजी नगर, संगमवाडी, येरवडा, टिळक रस्ता, आपटे रस्ता आणि पेठांच्या भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. शहरातील अनेक भागांमध्ये दीड ते दोन तास पाऊस झाल्यानं शहरवासियांची चांगलीच धावपळ उडाली.(HT)

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात पावसानं विश्रांती घेतली होती. परंतु काल शहरात अचानक पावसानं जोर धरल्यानं शहरातील रस्ते जलमय झाले होते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात पावसानं विश्रांती घेतली होती. परंतु काल शहरात अचानक पावसानं जोर धरल्यानं शहरातील रस्ते जलमय झाले होते.(HT)

काही दिवसांपूर्वीच पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. याशिवाय अतिवृष्टीमुळं जिल्हाधिकारी कार्यालयातील खिडक्यांही उडाल्या होत्या. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पावसानं पुन्हा पुणेकरांना झोडपून काढलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

काही दिवसांपूर्वीच पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. याशिवाय अतिवृष्टीमुळं जिल्हाधिकारी कार्यालयातील खिडक्यांही उडाल्या होत्या. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पावसानं पुन्हा पुणेकरांना झोडपून काढलं आहे.(HT)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज