Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली! जागोजागी साचले पाणी; विमान उड्डाणांना विलंब, वाहतूक कोंडीने नागरिक बेजार
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली! जागोजागी साचले पाणी; विमान उड्डाणांना विलंब, वाहतूक कोंडीने नागरिक बेजार

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली! जागोजागी साचले पाणी; विमान उड्डाणांना विलंब, वाहतूक कोंडीने नागरिक बेजार

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली! जागोजागी साचले पाणी; विमान उड्डाणांना विलंब, वाहतूक कोंडीने नागरिक बेजार

Updated Jul 12, 2024 03:42 PM IST
  • twitter
  • twitter
  • Mumbai Rain Update : मुंबईत सकाळ पासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचे पाणी सखल भागात साचले आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्ते जलमय झाले आहेत. या मुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. तर पावसामुळे मुंबईच्या विमानसेवेवर देखील परिणाम झाला असून अनेक उड्डाणांना उशीर झाला आहे.
CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले आहे. ११ ते १२ जुलै रोजी सकाळपर्यंत कुलाबा येथे ८६ मिमी तर सांताक्रूझ येथे ११५ मिमी पावसाची नोंद झाली. चेंबुर येथील पोस्टल कॉलनीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून यातून मार्ग काढतांना दुचाकी चालक पादचारी यांची तारांबळ उडाली होती. 
twitterfacebook
share
(1 / 6)

(Satish Bate/Hindustan Times)
भारतीय हवामान खात्याने मुंबईला शनिवारपर्यंत  ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत मुंबईत  तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, तसेच उपनगरात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 
twitterfacebook
share
(2 / 6)

मुंबईसह शहरासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये १५ जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. 
twitterfacebook
share
(3 / 6)

आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उपनगरीय रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि तीन तासात १७० मिमी पावसाची नोंद झाली होती. 
twitterfacebook
share
(4 / 6)

(PTI)
शहरात पाणी साचल्याने बसमार्गही वळविण्यात आले आहेत. शहराची लाईफलाईन असलेल्या सार्वजनिक उपनगरीय गाड्यांनाही विलंब होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. 
twitterfacebook
share
(5 / 6)

शहरात पाणी साचल्याने बसमार्गही वळविण्यात आले आहेत. शहराची लाईफलाईन असलेल्या सार्वजनिक उपनगरीय गाड्यांनाही विलंब होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. 

(Satish Bate/Hindustan Times)
आज सकाळ पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या सोबतच ढगाळ हवामानामुळे मुंबई विमानतळावरून उड्डाणांना देखील उशीर झाला होता.  
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज