Maharashtra Rain Update : मुंबईसह कोकणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
(1 / 5)
Maharashtra Rain and Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पाऊस अचानक गायब झाला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.(HT)
(2 / 5)
Mumbai Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचं दिसून येत आहे. मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या आहे.(HT_PRINT)
(3 / 5)
Maharashtra Weather Update : कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तासांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.(HT_PRINT)
(4 / 5)
Maharashtra Rain and Weather Update : याशिवाय विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.(PTI)
(5 / 5)
Maharashtra Weather Update : मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. परंतु येत्या २४ ऑगस्ट पर्यंत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज आहे.(HT_PRINT)
(6 / 5)
Maharashtra Weather Update : पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.(PTI)