मुंबईसह किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान, मध्यरात्रीपासून मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचं वृत्त आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघरसाठी आज यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच काही तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.
मुंबईत रात्रीपासूंन मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. पुढील ३ ते ४ तासांत पावसाचा जोर वाढणार आहे.
मुंबईत आज तापमानात देखील घट झालेली आढळली. कमाल व किमान तापमान हे २९ ते ३५ डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहणार आहे.
मध्यरात्रीपासून मुंबईत ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर व सखल भागात साचले असल्यामुळे याचा परिमाण हा वाहतुकीवर झालं आहे. सकाळ पासून काही भागात वाहतूक ही संथ गतीने पुढे जात आहे.
(PTI)सखल भागात पाणी साचले असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. काही घरात देखील पाणी गेल्याचे वृत्त आहे. आज सकाळी साडेपाच वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत ५१.८ तर पश्चिम उपनगरात २८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
(Hindustan Times)राज्याच्या विविध भागात आज पावसाचा जोर वाढणार आहे. प्रामुख्याने कोकणात आज अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट तर, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
(Rajesh Sachar)