Pune Rain : पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज देखील पुण्याला पावसाने झोडपले आहे. दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.
(1 / 6)
राज्यातून मॉन्सून परतीच्या प्रवासाला लागला आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक जिल्हयात आज पावसाचा इशारा देण्यात आला होता. पुण्याला रविवार पासून जोरदार पाऊस सुर आहे. मंगळवारी दुपारी शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला.
(2 / 6)
मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण शहरात होते. पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण तयार झाले होते. त्यानंतर दुपारी ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जोरदार पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
(3 / 6)
सिंहगड रस्ता, बाणेर-बालेवाडी, सातारा रस्ता, कात्रज, लष्कर परिसर, हडपसर, कात्रज, लोहगाव विमाननगर अशा सर्वच भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला.
(4 / 6)
पावसामुळे कात्रज-कोंढवा रस्त्यासह नगर रस्ता, सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. पावसामुळे काही काळ वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.
(5 / 6)
सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, रविवार पासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. सध्या परतीच्या पासवासाठी हवामान अनुकूल झाले आहेत. हवामान विभागाने दीलेल्या माहितीनुसार नैऋत्य मौसमी वारे राजस्थान व कच्छच्या काही भागांतून माघारी फिरले आहे.
(6 / 6)
त्यामुळे या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्हयानहण ऑरेंज तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.