मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Weather update : मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी आरोग्य सांभाळा! पुढील दोन दिवस उकाड्याचे

Mumbai Weather update : मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी आरोग्य सांभाळा! पुढील दोन दिवस उकाड्याचे

May 31, 2024 07:04 AM IST
  • twitter
  • twitter
  • Mumbai Weather update : राज्यात उष्णतेची लाट आली आहे. मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. मुंबईत देखील पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी पुरेशी काळजी घेऊनच बाहेरपडा असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. मॉन्सून केरळात दाखल झाला असला तरी राज्यात येण्यासाठी थोडा अवधी आहे. मात्र, त्या पूर्वी उष्णतेची मोठी लाट देशात आली आहे. 
share
(1 / 7)
राज्यात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. मॉन्सून केरळात दाखल झाला असला तरी राज्यात येण्यासाठी थोडा अवधी आहे. मात्र, त्या पूर्वी उष्णतेची मोठी लाट देशात आली आहे. (ANI)
काही दिवसांपासून हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. तापमानात घट झाली असली, तरी उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे.
share
(2 / 7)
काही दिवसांपासून हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. तापमानात घट झाली असली, तरी उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे.
मुंबईतील नागरिक  उकाड्यामुळे  हैराण झाले आहेत. हवेतील आर्द्रता आणि त्यात तापमान वाढ यामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत.  शुक्रवार व शनिवारी मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत उष्ण व दमट वातावरण राहणार आहे. तर  दुपारनंतर काही भागांत तुरळक ठिकाई हलका पाऊस पडण्यची शक्यता आहे. 
share
(3 / 7)
मुंबईतील नागरिक  उकाड्यामुळे  हैराण झाले आहेत. हवेतील आर्द्रता आणि त्यात तापमान वाढ यामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत.  शुक्रवार व शनिवारी मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत उष्ण व दमट वातावरण राहणार आहे. तर  दुपारनंतर काही भागांत तुरळक ठिकाई हलका पाऊस पडण्यची शक्यता आहे. (PTI)
तापमान वाढ आणि आद्रता यामुळे  मुंबईकर त्रस्त झाले आहेत.  उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. मुंबईत आर्द्रता ही  ७० टक्क्यांहून अधिक होती. 
share
(4 / 7)
तापमान वाढ आणि आद्रता यामुळे  मुंबईकर त्रस्त झाले आहेत.  उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. मुंबईत आर्द्रता ही  ७० टक्क्यांहून अधिक होती. (AP)
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३५.१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.  
share
(5 / 7)
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३५.१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.  (PTI)
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज शुक्रवार आणि उद्या शनिवारी मुंबईत उष्ण व दमट वातावरण राहणार आहे. त्यामुळे मुंबई करांनी घराबाहेर पडण्याआधी काळजी घेणे गरजेचे आहे. 
share
(6 / 7)
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज शुक्रवार आणि उद्या शनिवारी मुंबईत उष्ण व दमट वातावरण राहणार आहे. त्यामुळे मुंबई करांनी घराबाहेर पडण्याआधी काळजी घेणे गरजेचे आहे. 
पुण्यात देखील काही दिवस तापमानात मोठी वाढ झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाली आहे. पुण्यात अंशत: ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
share
(7 / 7)
पुण्यात देखील काही दिवस तापमानात मोठी वाढ झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात दोन ते तीन अंशांनी घट झाली आहे. पुण्यात अंशत: ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (PTI)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज