रात्री पुरेशी झोप न घेतल्यास भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. इतकंच नाही तर, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मूडवर देखील याचा नकारात्मक परिणाम होतो. झोपेच्या कमतरतेमुळे नैराश्य, लठ्ठपणा, टाईप २ मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब होण्याचा धोका वाढतो. अशावेळी रात्री शांत झोप लागत नसेल, तर तुम्ही देखील या टिप्स ट्राय करू शकता.
द्रव पदार्थ प्या : झोपण्यापूर्वी जास्तीत जास्त द्रव पदार्थ प्या. मात्र, मद्यपान करू नका. यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो. या ऐवजी कोमट दूध, ग्रीन टी आणि फळांचा रस घेऊ शकता. द्रव पदार्थ झोपेच्या चक्रास प्रोत्साहित करतात.
(freepik)मोबाईल, लॅपटॉप वगैरे पाहू नका : झोपण्यापूर्वी मोबाईल, लॅपटॉप वगैरे न बघणेच चांगले. मेलाटोनिन एक संप्रेरक आहे, जे मेंदूत नैसर्गिकरित्या स्त्रवत असते. फोन, लॅपटॉप किंवा टीव्हीच्या अनैसर्गिक प्रकाशाच्या संपर्कात येण्यामुळे मेलाटोनिन स्त्रवण्यास अडथळा येतो, ज्यामुळे झोपणे कठीण होते.
(freepik)बेडरूम आरामदायी ठेवा : बेडरूम शक्य तितकी थंड ठेवावी. बंद खोलीत सहसा उबदार वातावरण असते. यासाठी झोपण्यापूर्वी घट्ट कपडे घालू नयेत. शक्यतो सुती कपडे घालावेत. बेडशीट देखील कॉटनच्या असव्यात.
(freepik)बल्ब लावू नका : स्मार्टफोनच्या प्रकाशामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो, हे सगळ्यांनाच ज्ञात आहे. कधी कधी रात्री झोपताना बाथरूमला जाण्यासाठी उठावं लागतं. त्यामुळे बहुतांश लोक बाथरूमचा दिवा चालू ठेवतात. यामुळे झोपेतही व्यत्यय येतो. त्यामुळे सौम्य बॅटरी लाईट वापरणे चांगले.
(freepik)