(2 / 7)रात्री फळे का खाऊ नयेत? : अनेकांना दिवसभर फळे खायला वेळ मिळत नाही. म्हणून असे लोक रात्री फळे खातात. मात्र, सूर्यास्तानंतर शरीरातील पचनक्रिया कमी होते, असे तज्ज्ञ ल्यूक कौटिन्हो यांचे म्हणणे आहे. दरम्यान, फळे हे प्रकारचे कार्ब आहेत, तसेच, ती उर्जेचा खूप जलद स्त्रोत आहे आणि त्यात शुगर स्पाइक्सची क्षमता आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर फळे खाणे फायदेशीर ठरत नाही. यामुळे पचनाचे विकार होऊ शकतात. त्याचा परिणाम रात्रीच्या झोपेवर होऊ शकतो. तसेच रात्री फळे खाल्ल्याने अॅसिडिटी, अपचन होण्याची शक्यता असते, असेही म्हटले जाते.