(1 / 6)खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे थायरॉईडचा आजार आज लोकांमध्ये एक सामान्य समस्या म्हणून उदयास येत आहे. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे, जी मानेच्या खालच्या भागात असते. ही ग्रंथी शरीराच्या अनेक क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. थायरॉईड ग्रंथीतून बाहेर पडणाऱ्या हार्मोनला थायरॉईड संप्रेरक म्हणतात. जेव्हा ही ग्रंथी आवश्यकतेपेक्षा कमी-जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार करू लागते, तेव्हा त्या व्यक्तीला थायरॉईडशी संबंधित समस्या असू शकतात. साधारणपणे असे मानले जाते की थायरॉईडमुळे थकवा, वजन वाढणे, थंडी सहन न होणे, त्वचा कोरडी होणे, केस गळणे, नैराश्य आणि ह्रदयाचा वेग कमी होणे अशी लक्षणे दिसतात. पण, थायरॉईडचा माणसाच्या डोळ्यांवरही वाईट परिणाम होतो हे अनेकांना माहीत नाही.(shutterstock)