बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यांचा सर्वात आधी माणसाच्या यकृतावर वाईट परिणाम होतो. सामान्यतः लोकांना असे वाटते की, फक्त दारू प्यायल्याने एखाद्या व्यक्तीचे यकृत खराब होते, परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. दैनंदिन जीवनाशी संबंधित हे ५ पदार्थ देखील यकृत खराब करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
(shutterstock)यकृत हा मानवी शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचे काम रक्त फिल्टर करणे, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे आणि पाचक एंझाइम सोडणे हे आहे.
(shutterstock)जेव्हा एखाद्या व्यक्तीला यकृताचा आजार असतो, तेव्हा थकवा, मळमळ, उलट्या, पोटदुखी, कावीळ आणि सूज यांसारखी लक्षणे दिसू लागतात.
(shutterstock)अल्कोहोलचे जास्त सेवन हे यकृतासाठी विष मानले जाते. अल्कोहोलचे जास्त सेवन केल्याने यकृतामध्ये जळजळ आणि नुकसान होण्याचा धोका वाढतो.
(shutterstock)जास्त साखर असलेले पदार्थ जसे कँडी, गोड कुकीज इत्यादी पदार्थ रिफाईंड साखर वापरून बनवले जातात. या साखरेमध्ये उच्च फ्रक्टोज असते, ज्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो.
(shutterstock)बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज इत्यादी फास्ट फूड पदार्थही यकृताच्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत. या गोष्टींचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने फॅटी लिव्हरचा धोका तर वाढतोच शिवाय खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याचा धोकाही वाढतो. ज्यामुळे नंतर हृदयविकार होऊ लागतो.
(shutterstock)जास्त मीठ खाल्ल्याने यकृतात पाणी साचते, ज्यामुळे यकृताला सूज येते. याशिवाय मिठाच्या अतिसेवनाने यकृतातील पेशींचा आकारही बिघडू शकतो.
(shutterstock)