अनेकांना आपल्या जेवणात जास्त मिरची घालण्याची सवय असते. पण त्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे
जर तुम्ही जास्त मिरची किंवा तिखट खाल्ले तर पचनसंस्थेत समस्या निर्माण होतात. पोटातील अल्सर आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजार होण्याचा धोका असल्याचे डॉक्टर सांगतात.
लाल तिखट किंवा मिरची पावडरमधील कॅप्सॅसिनमुळे पोट फुगते आणि पोट खराब होते.परिणामी आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.
मिरचीचे जास्त सेवन केल्यास हृदयाच्या अनेक समस्या, मधुमेह आणि कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.