(1 / 7)हरतालिकाला लावा ही साधी मेहंदी डिझाईन- महिला, मुलींसाठी सर्वात मोठा सण हरतालिकाचे व्रत यावर्षी ६ सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या दिवशी निर्जल व्रत करणाऱ्या सर्व स्त्रीया, मुली सुंदर तयार होतात. या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची उपासना केली जाते. अविवाहित मुली देखील आपला इच्छित वर मिळवण्यासाठी हे व्रत करतात. हरतालिकेला हातावर मेहंदी लावण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.