Hartalika Vrat : हरतालिकेला करा या ४ गोष्टी, वैवाहिक जीवनातील समस्यांपासून मिळेल आराम
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Hartalika Vrat : हरतालिकेला करा या ४ गोष्टी, वैवाहिक जीवनातील समस्यांपासून मिळेल आराम

Hartalika Vrat : हरतालिकेला करा या ४ गोष्टी, वैवाहिक जीवनातील समस्यांपासून मिळेल आराम

Hartalika Vrat : हरतालिकेला करा या ४ गोष्टी, वैवाहिक जीवनातील समस्यांपासून मिळेल आराम

Sep 01, 2024 06:36 PM IST
  • twitter
  • twitter
Hartalika Tritiya 2024 : सुखी आणि सुंदर वैवाहिक जीवनासाठी अनेक व्रत केले जातात. परंतू, हरतालिका हे व्रत यासाठी खास मानले जाते. पार्वतीने हे व्रत भगवान शंकरासाठी केले होते. या दिवशी सुखी आणि सुंदर वैवाहीक जीवनासाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घ्या.
हरतालिका हे व्रत दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला साजरे केले जाते. यंदा हरतालिका तृतीया हे व्रत ६ सप्टेंबर रोजी साजरे केले जाणार आहे. हरतालिकेच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकर यांची पूजा केली जाते. या दिवशी विवाहित स्त्रिया दीर्घायुष्य आणि सौभाग्यासाठी आपल्या पतीची पूजा करतात आणि उपवास करतात. अविवाहित मुलींसाठीही हा सण खूप खास आहे. अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करतात.
twitterfacebook
share
(1 / 7)

हरतालिकेच्या दिवशी उपवास करतात. या व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया सौभाग्यासाठी गौरीचा आशीर्वाद घेतात. अनेकदा असे घडते की, अनेक महिलांना त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा महिलांसाठी हरतालिका हे व्रत खूप फायदेशीर ठरू शकते.
twitterfacebook
share
(2 / 7)

ज्या महिलांना त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या येत आहेत त्यांनी ६ सप्टेंबरच्या पूजेसोबत काही उपाय करावेत, ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद परत येऊ शकतो. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी कोणते उपाय करावेत, त्या उपायांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
twitterfacebook
share
(3 / 7)

हरतालिका व्रताच्या दिवशी प्रथेप्रमाणे भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करा. शेवटी, हरतालिका संबंधित व्रताची कथा पठण करा आणि नंतर देवी पार्वतीला दूध अर्पण करा. हे दूध तुमच्या जोडीदाराला प्रसाद म्हणून पाजावे. त्यामुळे पती-पत्नीचे नाते अधिक घट्ट होते. तसेच वैवाहिक जीवन आनंदी होते.
twitterfacebook
share
(4 / 7)

हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया निर्जळी उपवास करतात आणि महादेवाची मनोभावे पूजा करतात. या दिवशी स्त्रिया सुंदर तयारी करतात आणि जवळच्या शिवमंदिरात किंवा घरच्या घरी महादेवाची पिंड तयार करून विधिवत पूजा करतात. या दिवशी संपूर्ण दिवस ॐ गौरी शंकरा नमः मंत्राचा जप करा.
twitterfacebook
share
(5 / 7)

तसेच शक्य असल्यास पार्वती देवीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करा आणि ७, ११, किंवा २१ रुपये तुमच्या भक्तीनुसार या लाल वस्त्रात बांधा. पूजा संपवून ते धन लाल वस्त्रात बांधावे. त्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते.
twitterfacebook
share
(6 / 7)

अविवाहित मुलींना त्यांच्या आवडीचा वर हवा असेल तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शिव आणि माता पार्वतीच्या मंदिरात जावे लागते. मंदिरात देवी पार्वती आणि भगवान शंकराला लाल गुलाब अर्पण करा. नंतर नंदी आणि शिवाला मध अर्पण करा. त्यानंतर इच्छित वरासाठी माता पार्वतीची प्रार्थना करा. असे केल्याने देवी पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
twitterfacebook
share
(7 / 7)

हरतालिकेच्या दिवशी पूजा आटोपल्यानंतर किमान पाच विवाहित महिलांना भक्तीनुसार सौभाग्याच्या काही वस्तू किंवा वस्त्र दान करावे. धार्मिक श्रद्धेनुसार, यामुळे वैवाहिक जीवनात आनंद कायम राहतो. टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
twitterfacebook
share
(8 / 7)

इतर गॅलरीज