
भारताला या महिन्यात आशिया कप टी-20 स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात २८ ऑगस्टला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. याआधी भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या ग्रीसमध्ये सुट्टी घालवून परतला आहे. हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविकने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर यासंबंधीचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
नतासा आणि हार्दिक काही दिवसांपूर्वी ग्रीसमधील सॅंटोरिनी बेटावर सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अगस्त्यही होता. फोटोंमध्ये पांड्या कुटुंब समुद्र आणि बीचचा आनंद लुटताना दिसत आहे.
पांड्या फॅमिली आता भारतात परतली आहे. हार्दिकने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये श्रेयस अय्यरसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. यावरून तो आता भारतात परतल्याचे दिसून येते.
२०२० मध्ये हार्दिकने सर्बियन मॉडेल आणि बॉलीवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी एंगेजमेंट केली होती. त्यानंतर काही महिन्यांनी दोघांचे लग्न झाले.
नताशासोबत लग्न केल्यानंतर हार्दिकच्या आयुष्यात अनेक चांगल्या घटना घडल्या आहेत. त्याने गुजरात टायटन्सला जेतेपद मिळवून दिले. तसेच, अनेक महत्त्वाच्या प्रसंगी भारतीय संघाला देखील विजय मिळवून आहे.
हार्दिकच्या आयुष्यात नताशा आल्यापासून तो अधिक जबाबदार बनला आहे. हार्दिक आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाही. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकादरम्यान हार्दिकला दुखापत झाली होती.
यानंतर त्याने एनसीएमध्ये रिहॅबसाठी बराच वेळ घालवला. त्यासोबतच तो कुटुंबासोबत वेळ घालवतानाही दिसला. कोरोनाच्या काळात कुटुंब असणं खूप महत्त्वाचं असते, असे हार्दिकने एकदा म्हटलं होतं.
गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर हार्दिकला संघातून वगळण्यात आले होते. हार्दिकने नंतर खुलासा केला की त्याने स्वतः बीसीसीआयला त्याला वगळण्याचे आवाहन केले होते जेणेकरून तो थोडा फ्रेश होऊ शकेल.
त्या ब्रेकमध्ये हार्दिकने शांतपणे आयपीएलची तयारी केली. हार्दिकची टीम गुजरात टायटन्स आयपीएल चॅम्पियन ठरली. हार्दिकने आयपीएलमध्ये ४८७ धावा केल्या होत्या. फायनलमध्ये तो सामनावीरही ठरला होता. तसेच, आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो टीम इंडियाचा कर्णधारही होता.

_1660906342954.jpg)
_1660906363446.jpg)


_1660906448324.jpg)
_1660906497209.jpg)
_1660906500696.jpg)