
सर्वाधिक विजयांची टक्केवारी असलेल्या कर्णधारांची ही यादी आहे. ही यादी किमान २० सामन्यांमध्ये कर्णधार असलेल्या खेळाडूंवरुन तयार करण्यात आली आहे.
या यादीत गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या ७५ टक्के विजयासह अव्वल स्थानावर आहे. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातचे २१ सामन्यांत १५ विजय, ५ पराभव झाले आहेत.
या यादीत चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आहे. धोनीने २१७ सामन्यांमध्ये १२८ सामने जिंकले आहेत तर ८८ सामने हरले आहेत. त्याच्या विजयाची टक्केवारी ५८.९९ आहे.
विशेष म्हणजे, सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा टॉप-५ मध्येही येत नाही. तो १४९ सामन्यांमध्ये ८३ विजय, आणि ६५ पराभवासंह आठव्या क्रमांकावर आहे.
हिटमॅन रोहित शर्माच्या वर अनुक्रमे सचिन तेंडुलकर, स्टीव्ह स्मिथ, अनिल कुंबळे, ऋषभ पंत आणि शेन वॉर्नसारखे दिग्गज आहेत.



