भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते हार्दिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. हार्दिकने भारतीय संघासाठी ज्याप्रकारे योगदान दिले आहे त्यामुळे त्याला लोकांचेही प्रेम मिळत आहे.
घोट्याच्या दुखापतीमुळे त्याला वनडे विश्वचषक २०२३ मधील बहुतेक सामन्यांत मैदानाबाहेर बसावे लागले. डॉक्टरांनी त्यांना २५ दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी पाच दिवसांत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे त्यांची दुखापत आणखीनच वाढली. त्यानंतर हार्दिक काही काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला. आणि IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून पूर्णपणे तंदुरुस्त होऊन परतला. अशा परिस्थितीत, आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हार्दिक स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करतो. त्याचा आहार कसा असतो.
वर्कआउटसोबतच हार्दिक त्याच्या डाएटबाबतही चांगलाच सक्रिय असतो. तो सहसा बाहेरचे खाण्यापेक्षा घरी शिजवलेले अन्न खाणे पसंत करतो.
यासाठी तोआपल्या आहारात भाज्या आणि फळांसह प्रोटीन, कार्बोहायड्रेट, हेल्दी फॅट्स घेतो. तो उकडलेली अंडी, चिकन, उकडलेल्या भाज्या, दही भात, भेंडी असे अन्न खातो. हार्दिक सकाळी नारळ पाणीदेखील पितो.
तंदुरुस्त राहण्यासाठी तो जोरदार कसरत आणि व्यायाम करतो. यासाठी तो वेट लिफ्टिंग, रनिंग आणि कार्डिओ करतो. त्याला डेडलिफ्ट्स, पुशअप्स आणि पुलअप्स करायला आवडतात. मसल्स फॅट राखण्यासाठी हार्दिक दुहेरी व्यायामासोबत वेट ट्रेनिंगही करतो.