पौराणिक कथांनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला भगवान गणेशाचा जन्म झाला होता. भारतभर विविध नावांनी तो ओळखला जातो. याला माघ विनायक चतुर्थी, तिळकुंड चतुर्थी आणि वरद चतुर्थी असेही म्हणतात. १ फेब्रुवारी २०२५ शनिवार रोजी, माघी गणेश चतुर्थी असून यानिमित्त आपल्या प्रियजणांना खास शुभेच्छा देऊन दिवस खास बनवा.
(Freepik)रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा…
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो;
ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी सर्वांना,
माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
माघी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!