मुमताज ऊर्फ मुमताज अस्करी माधवानी इराणी वंशाच्या ज्येष्ठ भारतीय अभिनेत्री आहेत. आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी १००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी त्यांच्या अनोख्या फॅशन स्टाईल्सनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. ३१ जुलै रोजी मुमताज आपला ७७वा वाढदिवस साजरा करत आहेत. याच निमित्ताने त्यांच्या काही न पाहिलेल्या फोटोंची एक झलक बघाच...
मुमताज यांची कुस्तीपटू-अभिनेता दारा सिंह यांच्यासोबत सर्वात यशस्वी जोडी होती. नुकत्याच दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये ज्येष्ठ अभिनेत्रीने दिवंगत अभिनेत्याला सुरुवातीच्या काळात साथ दिल्याचे श्रेय दिले. या दोघांनी फौलाद, सॅमसन, हरक्युलिस, सिकंदर ए आझम, डाकू मंगल सिंग यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.
१९६८मध्ये शम्मी कपूर यांच्या 'ब्रह्मचारी' या चित्रपटात मुमताज यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. शम्मी कपूरसोबतचे त्यांचे लोकप्रिय गाणे - 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चा हे' हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आयकॉनिक गाण्यांपैकी एक आहे. गाण्यातील अत्यंत ग्लॅमरस पद्धतीने साडी नेसण्याच्या स्टाईलचे श्रेयही त्यांना दिले जाते.
मुमताज यांनी फिरोज खान यांच्यासोबत १९७२मध्ये आलेल्या क्राइम-थ्रिलर 'अपराध' या चित्रपटात काम केले होते. ‘उपासना’, ‘मेला’ आणि ‘नागिन’सारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्यासोबत काम केलेल्या दिवंगत अभिनेत्याने या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले होते.
सदाबहार देव आनंद यांच्यासह हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील सर्व सुपरस्टार्ससोबत मुमताज यांनी स्क्रीन शेअर केली होती. 'हरे रामा हरे कृष्णा' तसेच विजय आनंद यांच्या 'तेरे मेरे सपने' या चित्रपटात त्यांनी त्यांच्यासोबत काम केले होते.
१९६७मध्ये आलेल्या 'राम और श्याम' या कॉमेडी-ड्रामा चित्रपटात मुमताज यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटात दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री दुहेरी भूमिकेत झळकली होती, या चित्रपटात प्राण आणि वहिदा रेहमान देखील मुख्य भूमिकेत होते.
मुमताज हिंदी चित्रपटांमधील फॅशनची नव्याने ओळख करून देण्यासाठी ओळखल्या जातात. त्यांना ट्रेंडसेटर मानले जाते. या अभिनेत्रीने पारंपारिक तसेच भारतीय, अशा दोन्ही आउटफिट्समध्ये आपला करिष्मा दाखवला. ६० आणि ७०च्या दशकात पारंपारिक बॉलिवूड हिरोईन्सबद्दलरूढी मोडल्यामुळे त्यांना नेहमीच प्रसिद्धी मिळाली.