बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतची मुलगी मीशा कपूरचा २६ ऑगस्ट रोजी ८वा वाढदिवस आहे. मीराने आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक गोड पोस्ट शेअर केली आहे.
मीराने मिशाचे न पाहिलेले फोटो शेअर करत लिहिले की, “मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यावर प्रेम करण्यात घालवीन. त्यासाठी सूर्यप्रकाश, चमक आणि तुला हव्या असलेल्या सर्वोत्तम गोष्टी मिळत राहाव्यात.”
मीराचे कुटुंबासोबतचे आनंदी फोटो इंटरनेटवर अनेकदा व्हायरल होत असतात, शाहिदचे आपल्या मुलीसोबतचे समीकरण जाणून घेण्यासाठी चाहते खूप आनंदी असतात.
मीरा ही नेहमीच दोन्ही मुलांसोबत वेळ घालवते. तिचा हा फोटो 'मम्मी सँडविच' असे म्हणत शेअर केला गेला होता.
शाहिदची मुलगी फुले गोळा करून आपल्या वडिलांच्या हातात देत असल्याचे दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावप तुफान व्हायरल झाला आहे.