मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Dinesh Karthik Dipika Pallikal : दिनेश कार्तिकची जिमवाली लव्हस्टोरी, स्क्वॅशपटू दीपिकाला असं पटवलं

Dinesh Karthik Dipika Pallikal : दिनेश कार्तिकची जिमवाली लव्हस्टोरी, स्क्वॅशपटू दीपिकाला असं पटवलं

Jun 01, 2023 05:01 PM IST Rohit Bibhishan Jetnavare

  • Dinesh Karthik Birthday : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आज (१ जून) ३८ वर्षांचा झाला. १९८५ मध्ये जन्मलेल्या दिनेश कार्तिकचे क्रिकेट करिअर अनेक चढ-उतारांचे राहिले आहे. कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या लव्हस्टोरीबद्दल (Dinesh Karthik love story) सांगणार आहोत.

भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल यांची लव्हस्टोरी ही कोणत्याही बॉलिवूड प्रेमकथेपेक्षा कमी नाही. दोघांची पहिली भेट जिममध्ये झाली होती. त्यानंतर दोन्ही खेळाडू एकमेकांच्या प्रेमात पडले.
twitterfacebookfacebook
share

(1 / 7)

स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलला आधी क्रिकेट आणि क्रिकेटर आवडत नव्हते. कारण क्रिकेटपटूंइतकी प्रसिद्धी आणि लोकप्रियता इतर कोणत्याही खेळातील खेळाडूंना मिळत नाही, असे तिचे मत होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 7)

दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांची पहिली भेट २०१२ साली एका जिममध्ये झाली होती. दोघेही एकाच ट्रेनरकडून प्रशिक्षण घ्यायचे. दीपिकाला क्रिकेट आवडत नव्हते. यादरम्यान दोघांची मैत्री झाली.
twitterfacebookfacebook
share

(3 / 7)

२०१३ मध्ये दिनेश कार्तिकने दीपिकाला प्रपोज केले. यानंतर दोघांची एंगेजमेंट झाली. एकदा दिनेश कार्तिक दीपिका पल्लीकलला भेटण्यासाठी इंग्लंडला पोहोचला होता. तेव्हा ती खूपच इम्प्रेस झाली होती. तेव्हा कार्तिक भारताकडून खेळायचा आणि दीपिका इंग्लंडमध्ये ट्रेनिंग घेत होती.
twitterfacebookfacebook
share

(4 / 7)

दिनेश-दीपिका जवळपास २ वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर १८ ऑगस्ट २०१५ रोजी दोघांनी चेन्नईमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले.
twitterfacebookfacebook
share

(5 / 7)

दरम्यान, कार्तिकचे पहिले लग्न निकिता वंजारासोबत झाले होते. मात्र, २०१२ मध्ये हे लग्न तुटले. निकिताने नंतर क्रिकेटर मुरली विजयसोबत लग्न केले. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 7)

दरम्यान, कार्तिकचे पहिले लग्न निकिता वंजारासोबत झाले होते. मात्र, २०१२ मध्ये हे लग्न तुटले. निकिताने नंतर क्रिकेटर मुरली विजयसोबत लग्न केले. (photos- Dinesh Karthik Instagram)

१८ ऑक्टोबर २०२१ रोजी दिनेश कार्तिक आणि दीपिका आई-वडिल बनले. त्यांना कबीर आणि जियान नावाची दोन जुळी मुले आहेत. दिनेश आणि दीपिका अनेकदा क्वालिटी टाइम घालवतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 7)

१८ ऑक्टोबर २०२१ रोजी दिनेश कार्तिक आणि दीपिका आई-वडिल बनले. त्यांना कबीर आणि जियान नावाची दोन जुळी मुले आहेत. दिनेश आणि दीपिका अनेकदा क्वालिटी टाइम घालवतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज