अभिनेत्री बबिता यांचा जन्म २० एप्रिल १९४७ रोजी मुंबईत झाला. १९७१मध्ये त्यांचे लग्न झाले. या लग्नात शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांनी रणधीर कपूर आणि बबिता यांच्यासोबत पोझ देत होते. बबिता आणि रणधीर यांची धाकटी मुलगी, अभिनेत्री करिना कपूर हिचा विवाह शर्मिला आणि टायगर पतौडी यांचा मुलगा सैफ अली खान सोबत झाला आहे. (सर्व छायाचित्रे : रेडिट)
बबिता यांचा पहिला चित्रपट ‘दस लाख’ (१९६६) हा खूप गाजला होता, परंतु, राजेश खन्नासोबतच्या रोमँटिक थ्रिलर चित्रपट ‘राज’ने (१९६७) त्यांना खरी ओळख मिळवून दिली.
१९६६ ते १९७३ या काळात बबिता यांनी मुख्य नायिका म्हणून जवळपास २० चित्रपटांमध्ये काम केले, ज्यात दस लाख (१९६६), फर्ज (१९६७), हसीना मान जाएगी, किस्मत (१९६८), एक श्रीमान एक श्रीमती (१९६९), डोली (१९६९), कब? क्यूं? और कहां? (१९७०), कल आज और कल (१९७१) आणि बनफूल (१९७१) या चित्रपटांचा समावेश आहे.
कल आज और कल (१९७१) या चित्रपटात रणधीर कपूर यांच्यासोबत काम करताना बबिता त्यांच्या प्रेमात पडल्या. ६ नोव्हेंबर १९७१ रोजी एका भव्य समारंभात त्यांचा विवाह झाला. त्यांना अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करिना कपूर या दोन मुली आहेत. रणधीरचे वडील राज कपूर यांनी या ब्लॅक अँड व्हाईट वेडिंग फोटोमध्ये नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले आहेत.
चित्रपट निर्माते अदुर्थी सुब्बा राव यांच्या जीत (१९७२) या चित्रपटात रणधीर कपूर यांच्यासोबत बबिता मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या. कायदेशीररित्या विवाहित असूनही बबिता आणि रणधीर अनेक वर्षे वेगळ्या घरात राहत होते. अनेक वर्षे वेगळे राहिल्यानंतर २००७ मध्ये हे जोडपे पुन्हा एकत्र आले.
बबिता आणि त्यांची मोठी मुलगी करिश्मा कपूर, करिश्माचा जन्म जून १९७४मध्ये झाला होता. करिश्मा तिच्या आईसोबतचे जुने फोटो शेअर करत असते. २० एप्रिल २०२४ रोजी तिच्या वाढदिवसानिमित्त, तिने थ्रोबॅक पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "हॅप्पी बर्थ डे टू यू गॉर्जियस मम्मा..."
या जुन्या फोटोत बबिता, रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि आरडी बर्मन एकत्र फोटो पोज देताना दिसले आहेत. ऋषी हा रणधीर यांचा धाकटा भाऊ होता.