(2 / 6)लिओनार्डो डिकॅप्रिओ: हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ याने ‘द ग्रेट गॅट्सबी’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या दरम्यानचा अनुभव सांगताना अभिनेता म्हणाला, ‘मी भारतीय चित्रपट पाहिले नव्हते. पण, अमिताभ बच्चन यांच्याबद्दल खूप ऐकून होतो. त्यांच्याकडे सांगण्यासारखी अनेक गोष्टी होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कशी केली, हे जाणून घेतल्यानंतर आता त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली याचा सन्मान वाटतो आहे. कॅमेरासमोरचे अमिताभ बच्चन आणि कॅमेरामागचे अमिताभ यांच्यात खूप फरक आहे.’