पाऊस पडला की, केस गळण्याची समस्या वाढते. डोक्याला हात लावला की हातात केसांचा गुच्छा येतो. पण ही समस्या केवळ पावसाळ्यातच नाही, तर, अनेकदा हिवाळ्यात हीच समस्या दिसून येते. हिवाळ्यात केस कोरडे पडणे, कोंडा यासारख्या समस्या वाढतात. पण हे कशामुळे होते? जाणून घ्या..
(pixabay)हिवाळ्यात जवळजवळ सगळेच गरम पाण्याने आंघोळ करतात. पण या गरम पाण्याने अंघोळ करण्याच्या सवयीमुळे तुमचे केस रुक्ष होतात, कारण गरम पाणी केसांमधील सर्व तेल शोषून घेते. साहजिकच केसांची चमक कमी होऊन केस गळतात.
(pixabay)हिवाळ्यात आंघोळ केल्यानंतर केस कोरडे व्हायला खूप उशीर होतो. जे रोज कामानिमित्त बाहेर पडतात, त्यांना केस वाळवायला, हेअर ड्रायरचा वापर करायला अतिरिक्त वेळ देखील मिळत नसतो.
(pixabay)नियमित हेअर ड्रायरच्या वापरामुळे केस रुक्ष होतात आणि केस गळण्याची समस्या वाढते. तथापि, हेअर ड्रायरचा वापर करून केवळ केसच नाही, तर स्काल्प देखील कोरडी होऊ शकते. याशिवाय रोज हेअर ड्रायरचा वापर केल्यास केस तुटण्याची किंवा कोंड्याची समस्याही वाढू शकते.
(pixabay)