मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  अवघ्या अर्ध्या दिवसांत पार पडलं ‘या’ मराठी गाण्याचं चित्रीकरण; कोकणातील गावाचा ‘हा’ भन्नाट किस्सा वाचाच!

अवघ्या अर्ध्या दिवसांत पार पडलं ‘या’ मराठी गाण्याचं चित्रीकरण; कोकणातील गावाचा ‘हा’ भन्नाट किस्सा वाचाच!

Apr 02, 2024 04:42 PM IST Harshada Bhirvandekar
  • twitter
  • twitter

Haan tu ti tu Marathi Song: या गाण्यात गावातील एक तरुण युवक आणि त्याची बहीण तसेच, एक तरूण युवती यांच्याभोवती फिरणारं हे कथानक आहे.

‘सजन घर आओ रे’ या गाण्याच्या यशानंतर ‘श्रीनिवास कुलकर्णी प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘हां तू…ती तू’ हे रोमॅंटिक गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. प्रेम आणि भावनांच्या अविस्मरणीय प्रवासाचे दर्शन या गाण्यात दिसून येते. अभिनेता वैभव लामतुरे आणि अभिनेत्री सुवर्णा दराडे ही सुंदर जोडी या गाण्यात एकत्र दिसणार आहे. राहुल झेंडे यांनी गाण्याच दिग्दर्शन व संकलन अशी दुहेरी जबाबदारी पार पाडली आहे. तर, छायाचित्रण शुभम धूम यांनी केलं आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

गायक अभिमन्यू कार्लेकर याने मधाळ आवाजात हे गाणं गायलं आहे व संगीतबद्ध देखील केलं आहे. तर गाण्याचे बोल सागर बाबानगर यांनी लिहीले आहे. शिवाय मेकअप सुरेश कुंभार, सह दिग्दर्शन संदीप बोडके, क्रिएटिव्ह प्रोडूसर आणि कॉस्ट्यूम रचना रघुनाथ यांनी केले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याचं चित्रीकरण निसर्गरम्य कोकणातील नांदगावमधील पौड गावात झालं आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

निर्माते श्रीनिवास कुलकर्णी गाण्याविषयी सांगतात, ‘हां तू…ती तू’ या गाण्याचे कथानक एका भावनिक प्रेम त्रिकोणाभोवती फिरते. या गाण्यात गावातील एक तरुण युवक आणि त्याची बहीण तसेच, एक तरूण युवती यांच्याभोवती फिरणारं हे कथानक आहे. अभिनेता वैभव लामतुरे आणि अभिनेत्री सुवर्णा दराडे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे, लोकप्रिय बालकलाकार अनन्या टेकवडे ही लहान बहिणीच्या भूमिकेत दिसत आहे. तर, आसावरी नितीन यांनी आईची भूमिका साकारली आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या गाण्याच्या चित्रीकरणाचा किस्सा सांगताना ते म्हणाले की, ‘कोकणातील नांदगावमधील पौड गावात या गाण्याचं चित्रीकरण करत असताना या गावात जत्रा भरली होती. त्यामुळे सगळ्या टीमला टेन्शन आलं होतं. आता हे गाणं कसं चित्रीत करणार कारण, कॅमेरा आणि शूटींगचं साहित्य काढलं की लगेच लोकांची गर्दी जमायची. आणि चित्रीकरणाच्या दिवशी जत्रेचा शेवटचा दिवस होता.’
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

‘पण त्या एकाच दिवसात शूटिंग करायचं होतं. अचानक दुपारी जत्रेच्या ठिकाणी लोकांची वर्दळ कमी व्हायला लागली. मग क्रूने गावातील काही लोकांना विचारलं असता, असं समजलं की गावाच्या पलीकडे कुस्त्यांच्या स्पर्धा भरल्या आहेत. म्हणून गावातील निम्याहून अधिक लोक कुस्त्या बघण्यासाठी गेले. मग आम्ही त्या अर्ध्या दिवसात गाण्याचं चित्रीकरण केलं. गाणं चित्रीत करताना खूप धम्माल आली’, असे ते म्हणाले.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज