शास्त्रानुसार पुष्य नक्षत्र शुभ कर्म, गुंतवणूक, व्यावसायिक व्यवहार, सोने-चांदी खरेदी, संपत्ती इत्यादींसाठी अत्यंत शुभ मानले जाते. २०२४ चे पहिले पुष्य नक्षत्र गुरुवारी येत असल्याने खूप खास आहे. अशा स्थितीत गुरु पुष्य योग जुळून येईल.
शास्त्रात गुरु हे पद, प्रतिष्ठा, यश आणि समृद्धीचे कारक मानले गेले आहे. गुरु पुष्य नक्षत्राच्या प्रभावाखाली केलेले कार्य नेहमीच यशस्वी होते असे मानले जाते. जानेवारी २०२४ मध्ये गुरु पुष्य नक्षत्र कधी आहे, तिथी आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया.
गुरु पुष्य नक्षत्र २०२४ तारीख: २५ जानेवारी २०२४ रोजी गुरु पुष्य नक्षत्र आहे. हे नक्षत्र नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, घरशांतीसाठी, मुंडन इत्यादी शुभ कार्यांसाठी शुभ मानले जाते.
गुरु पुष्य योग २०२४ खरेदी वेळ:
पंचांगानुसार, गुरु पुष्य योग २५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजून १६ मिनिटांनी सुरू होईल आणि २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजून २८ मिनिटांनी समाप्त होईल. तुम्हाला खरेदीसाठी आणि चांगल्या कामांसाठी २४ तासांपेक्षा जास्त वेळ मिळेल.
(फोटो प्रतिकात्मक आहे, पीटीआय सौजन्याने)
पुष्य नक्षत्राचे महत्त्व:
हे पाणिनी संहितेत लिहिलेले आहे – पुष्य सिद्धौ नक्षत्र सिद्धयंति अस्मिन् सर्वाणी कर्गणी सिद्ध. पुष्यन्ति अस्मिं सर्वाणी करगणि इति पुष्य ।
म्हणजेच पुष्य नक्षत्रात सुरू केलेले सर्व कार्य सकारात्मक, फलदायी आणि निश्चितच यशस्वी ठरतील.
गुरु पुष्य नक्षत्र का आहे विशेष :
पुष्य नक्षत्रावर शनि ग्रहाचे अधिपत्य आहे, आणि गुरुवार हा गुरु देवाचा दिवस आहे, त्यामुळे हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते आणि या नक्षत्रात जमीन, इमारती, रत्न, सोने-चांदी खरेदी करणे फायदेशीर आहे. गुरु पुष्य योगाच्या दिवशी खरेदी करता येत नसेल तर श्रीसूक्ताचा पाठ करा. यामुळे माता लक्ष्मी लवकरच प्रसन्न होईल. पैशाची कमतरता राहणार नाही.नवीन मालमत्ता खरेदी करणे किंवा फ्लॅट बुक करणे या दिवशी फायदेशीर ठरेल.