बृहस्पती हा नऊ ग्रहांपैकी सर्वात शुभ ग्रह आहे. तो संपत्ती, समृद्धी, संततीचे वरदान, विवाहाचे वरदान, आत्मविश्वास आणि धैर्याची देणगी आहे. बृहस्पती वर्षातून एकदा आपले स्थान बदलतो. त्याच्या गोचराचा सर्व राशींवर परिणाम पडेल. २०२५ मध्ये गुरु ग्रह राशीपरिवर्तन करेल.
गुरू ग्रह ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वृषभ राशीत वक्री स्थितीत आला आहे. तर ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत या स्थितीत राहील. गुरूच्या वक्री प्रवासाचा सर्व राशींवर परिणाम होत असला तरी काही राशींना त्यातून सुवर्णकाळ अनुभवता येणार आहे. या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत जाणून घ्या.
मेष :
गुरू तुमच्या राशीच्या दुसऱ्या स्थानी आहे. यामुळे अनपेक्षित वेळी आर्थिक लाभ होईल. व्यवसायात चांगला नफा होईल. नवीन सौदे आपल्या बाजूने होतील. जिथे काम कराल तिथे पदोन्नती आणि पगार वाढेल.
कन्या :
तुमच्या राशीच्या नवव्या भावात गुरू वक्री स्थितीत आहे. यामुळे तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल. तुम्हाला चांगल्या गोष्टी आणि आनंद मिळण्याची शक्यता अधिक राहील, आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि वैवाहिक जीवनातील सर्व समस्या कमी होतील.