Gurupushyamrut Yog In Marathi : गुरुवारी पुष्य नक्षत्राची जोडणी झाल्यास उत्पन्नाच्या संधी वाढतात. गुरु पुष्य योगाचा काही राशींवर शुभ प्रभाव पडेल. ज्यामुळे उत्पन्नाच्या बाबतीत या राशीच्या लोकांच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडेल . जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल.
(1 / 6)
ज्योतिषशास्त्रात गुरु पुष्य योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. आज म्हणजेच गुरुवार, २१ नोव्हेंबर रोजी गुरु पुष्य योग तयार होत आहे, जो वर्षातील शेवटचा गुरु पुष्य योग आहे.
(2 / 6)
गुरु पुष्य योगाचा काही राशींवर शुभ प्रभाव पडेल. त्याच्या प्रभावामुळे उत्पन्नाच्या बाबतीत अनेक राशींच्या जीवनात पैशांचा पाऊस पडेल. चला तर मग जाणून घेऊयात या कोणत्या राशी आहेत.
(3 / 6)
मिथुन : मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी वर्षातील शेवटचा गुरु पुष्य योग अनपेक्षित आर्थिक लाभ घेऊन येईल. या काळात तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ शकता. गुरु पुष्य योगात कुटुंबातील सदस्याला जे काही दिले जाते त्याचे सकारात्मक परिणाम होतील. आपल्या उत्पन्नात ही अचानक वाढ होण्याची शक्यता आहेत. पालक आणि शिक्षकांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांना यश मिळेल. मिथुन राशीच्या लोकांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यास त्यांना त्यात यश मिळेल.
(4 / 6)
कन्या : कन्या राशीच्या लोकांसाठी गुरु पुष्य योग विशेष लाभदायक ठरेल. जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर त्यातून अनेक फायदे मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकते. व्यवसायात फायदा होईल आणि वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील.
(5 / 6)
धनु : गुरु पुष्य योगाच्या शुभ प्रभावामुळे धनु राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गातील लोकांना जास्त नफा मिळेल. नोकरदारांना प्रगती आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. प्रेम जीवन सुदृढ राहील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
(6 / 6)
मकर : मकर राशीच्या व्यक्तींना वर्षातील शेवटच्या गुरु पुष्य योगातून इच्छित यश मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमच्यासाठी उत्पन्नात वाढ होण्याच्या नवीन शक्यता निर्माण होतील. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर वर्षाच्या अखेरीस मोठी डील फायनल होऊ शकते. विद्यार्थ्यांमध्ये ही सुधारणा होण्याची शक्यता आहे.