आषाढ महिन्यातली पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतात. रविवार २१ रोजी गुरुपौर्णिमा आहे. या शुभ दिवशी खास शुभ योगाचा काही राशींना फायदा होणार आहे. चला पाहूया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
(1 / 5)
यावर्षी गुरुपौर्णिमा २१ जुलै रोजी असून, सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, प्रीति योग, विश्वकुंभ योग यांच्या शुभ संयोगात साजरी होणार आहे. या योगांचा प्रभाव हा दिवस अधिक शुभ आणि फलदायी बनवतो. या शुभ प्रभावाचा ३ राशींना लाभ होणार आहे.(pixabay)
(2 / 5)
गुरुपौर्णिमा तिथी- गुरुपौर्णिमा २० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल. २१ जुलै रोजी ३ वाजून ४६ मिनिटांनी संपेल. परिणामी २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा तिथी साजरी होणार आहे.
(3 / 5)
मेष : उत्पन्न वाढेल. खर्च कमी होतील. व्यवसायात नफा वाढेल. त्यामुळे यावेळी प्रचंड प्रमाणात आर्थिक फायदा होत आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. आरोग्य चांगले राहील.
(4 / 5)
मिथुन: नोकरी-व्यवसायात भरभराट होईल. विद्यार्थ्यांना चांगला वेळ मिळेल. वेगवेगळ्या दिशांनी यश मिळेल. कोणत्याही जमिनीत, घरामध्ये गुंतवणूक करू शकता. जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न होऊ शकते. दीर्घकाळ चालत असलेल्या कोणत्याही शारीरिक व्याधीपासून मुक्ती मिळू शकते. कोणत्याही काळजीपासून मुक्त व्हा.
(5 / 5)
धनु : नोकरी-प्रमोशनसाठी या वेळी शुभ काळ आहे. पगार वाढू शकतो. करिअरमध्ये चांगली सुधारणा होऊ शकते. यशाची नवीन शिखरे गाठू शकाल. कुठेतरी आनंदाचा प्रवास घडू शकतो. वाचनात मन स्थिर होईल. ज्यांना परदेशात राहण्याची इच्छा आहे, त्यांची इच्छा आता पूर्ण होऊ शकते. तुम्हाला एखादी चांगली आनंदाची बातमी मिळू शकते. (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)