Guru Purnima 2024 Shubh Yog : गुरु पौर्णिमा हा गुरुंना समर्पित पवित्र सण आहे, जो आषाढ पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. जुलैमध्ये गुरुपौर्णिमा कोणत्या शुभ योगात आहे ते जाणून घेऊया.
(1 / 5)
हिंदू धर्मात गुरूचे स्थान देवाच्या बरोबरीचे आहे. दरवर्षी आषाढ पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. यादिवशी त्यांची पूजा करण्याचे महत्त्व असून, याच दिवशी वेदव्यासांची जयंती असल्याने याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात.
(2 / 5)
पौर्णिमा तिथी शनिवार, २० जुलै, २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजून ५९ मिनिटापासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, २१ जुलै २०२४ रोजी दुपारी ३ वाजून ४६ मिनिटांनी समाप्त होईल. उदयातिथी नुसार आषाढ पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा २१ जुलै रोजी साजरी केली जाईल.
(3 / 5)
या वर्षी गुरुपौर्णिमेला अनेक शुभ योग-संयोग तयार होत आहे. यादिवशी सर्वार्थ सिद्धी, रवि, प्रीती आणि विष्कुंभ योग घडतील. पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ७ वाजून १९ मिनिटे ते दुपारी १२ वाजून २७ मिनिटापर्यंत असेल. चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी ७ वाजून ३८ मिनिटे आहे.
(4 / 5)
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून वेदांचे निर्माते भगवान विष्णू आणि वेदव्यास यांची पूजा करावी. या दिवशी गुरूंच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घ्या आणि आपल्या क्षमतेनुसार दान करा.
(5 / 5)
गुरु आपल्या शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशात आणतात. जीवनाला योग्य दिशा देण्यात गुरूंचे विशेष योगदान आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी “गुरू पूर्णिमा:गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः” या मंत्राचा जप करा.