ज्योतिष शास्त्रात देवगुरु ‘गुरु’चे विशेष स्थान आहे. देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने व्यक्ती भाग्यवान ठरते. गुरु हा ग्रह ज्ञान, शिक्षण, धार्मिक कार्य, पवित्र स्थान, संपत्ती, दान, पुण्य आणि वृद्धी इत्यादीसाठी कारक ग्रह आहे, असे म्हटले जाते. २७ नक्षत्रांपैकी गुरु हा पुनर्वसु, विशाखा आणि पूर्वा भाद्रपद नक्षत्राचा स्वामी आहे. १३ जुलै रोजी देवगुरू बृहस्पति नक्षत्र बदलणार आहे. या दिवशी गुरू ग्रह रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
मेष: कपड्यांवर खर्च वाढेल. खूप मेहनत करावी लागेल. खर्च वाढतील. आत्मविश्वास कमी होईल, शांत राहा. आरोग्याबाबत सावध राहा. संचित संपत्ती, लेखन इत्यादीमध्ये घट होईल आणि बौद्धिक कार्यात नुकसान होऊ शकते.
मिथुन: वाहनाच्या देखभालीवर खर्च वाढू शकतो. अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. नोकरीतही बदल संभवतो. मनात निराशा आणि असंतोषाची भावना राहील. आत्मविश्वासाची कमतरता राहील. खर्च वाढतील.
सिंह: आईशी वैचारिक मतभेद होऊ शकतात. स्थान बदलणे शक्य आहे. संयम कमी होईल, मात्र संयम ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्त राग टाळा. तुमच्या बोलण्यात कठोरता असेल, संभाषणात संयम ठेवा. कपडे खरेदीकडे कल वाढेल.
कन्या: तुमच्या इच्छेविरुद्ध कार्यक्षेत्रात वाढ शक्य आहे. संभाषणात संयम ठेवा, खर्च वाढतील. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवा, अन्यथा वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. आत्मविश्वासाची कमतरता असेल पण कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. आपल्या खाण्याच्या सवयींबद्दल जागरूक रहा. आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
धनु: चांगल्या वेळेची धीराने वाट पहा. रक्ताशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. तुमच्यावर कायदेशीर खटला भरला जाऊ शकतो. मतभेद होऊ शकतात. एकंदरीत अतिशय काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे. घरगुती समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. इतरांना तुमच्या समस्यांचे कारण समजणे टाळा. एकाग्रतेचा अभाव राहील. भोंदूबाबांपासून सावध राहण्याची गरज आहे.