'बागबान'मध्ये सुमन रंगनाथन यांनी अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्या सुनेची भूमिका साकारली होती. सुमन रंगनाथन 90 च्या दशकात खूप लोकप्रिय अभिनेत्री होती. पण अचानक त्यांनी इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला.
१९९७ मध्ये सुमन रंगनाथन आणि फरहान अख्तर यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. 'मसाला डॉट कॉम'च्या रिपोर्टनुसार, फरहानच्या फ्लर्टिंगच्या सवयीमुळे सुमन नाराज होती. दोघांमध्ये भांडणे वाढू लागली आणि नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपच्या एका वर्षानंतर फरहानने अधुनाशी लग्न केले.
फरहाननंतर सुमन रंगनाथनचे नाव अभिनेता राहुल रॉयसोबत जोडले गेले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलने सुमनला तिच्या करिअरमध्ये खूप साथ दिली होती. दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते, पण काही गोष्टी अशा घडल्या ज्यामुळे त्यांचे नाते कायमचे तुटले.
ब्रेकअपनंतर सुमनने २८ डिसेंबर २००० रोजी गौतम नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. पण दोघांचेही पटले नाही. त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. यानंतर सुमनने निर्माता बंटी वालियाशी लग्न केले. दोघेही आठ वर्षे एकत्र राहिले आणि नंतर वेगळे झाले.