GT vs MI IPL 2023 : गुजरात टायटन्सच्या फिरकीसमोर मुंबई इंडियसन्सच्या फलंदाजांची दाणादाण उडाली आहे.
(1 / 6)
GT vs MI IPL 2023 : गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर तब्बल ५५ धावांनी विजय मिळवला आहे.(AFP)
(2 / 6)
यंदाच्या आयपीएलमधील गुजरातचा हा पाचवा विजय असून संघाने आयपीएलच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे.(IPL Twitter)
(3 / 6)
गुजरातकडून शुभमन गिलने ५६, अभिषेक मनोहरने ४२ आणि डेव्हिड मिलरने ४६ धावा करत मुंबईला २०८ धावांचं लक्ष्य दिलं होतं.(PTI)
(4 / 6)
गुजरातच्या धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. रोहित शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड हे दिग्गज फलंदाज स्वस्तात बाद झाले.(IPL Twitter)
(5 / 6)
मुंबईकडून पीयूष चावलाने दोन तर कुमार कार्तिकेय, अर्जुन तेंडूलकर, जेसन बेहरडॉर्फ आणि रायली मेरेडिथ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.(PTI)
(6 / 6)
गुजरातकडून फिरकीपटू नूर अहमद याने तीन, राशिद खान आणि मोहित शर्मा यांनी दोन आणि कर्णधार हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली.(PTI)