(3 / 5)'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अप्पीला विश्वास बसतो की, रुपालीपेक्षा अमोलची व्यवस्थित काळजी आणि संभाळ कोणीच करू शकत नाही. तेव्हा ती रूपालीला अमोल हा तुमचा पण मुलगा असल्याचे म्हणते. अमोलला आपण दोघी मिळून सांभाळू असे सांगते. हे बघून घरचे खुश होतात आणि अर्जुन-अप्पी व स्वप्निल-रुपाली अमोलचे आईबाबा आणि मोठ्ठे आईबाबा म्हणून अमोलला सांभाळायचे ठरवतात आणि पूर्ण परिवार मिळून गुढी पाडव्याचा सण साजरा करतात. अप्पी आणि रुपाली दोघी मिळून अमोलची काळजी घेतात. त्याला अंघोळ वगेरे घालून तयार करतात आणि मग अर्जुन आणि अप्पी, स्वप्निल-रुपाली व सुजय पियु गुढी उभारतात.