भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते.
इंग्रजी कॅलेंडरनुसार दरवर्षी १ जानेवारीला नवीन वर्ष सुरू होते. पण हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात वेगळ्या दिवशी होते. हिंदू कॅलेंडरबद्दल सांगायचे तर, चैत्र महिन्याची प्रतिपदा ही नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते. हिंदी दिनदर्शिकेनुसार, चैत्र महिन्याची प्रतिपदा ८ एप्रिल रोजी रात्री ११:५० वाजता सुरू होते. ही तिथी ९ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत मंगळवार, ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा सण साजरा केला जाणार आहे.
गुढीपाडव्याचे महत्त्व :
गुढी म्हणजे ध्वज. तर मराठीत प्रतिपदेच्या तिथीला पाडवा म्हणतात. त्यामुळे हा सण गुढी पाडवा म्हणून ओळखला जातो. धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवाने चैत्र महिन्यात जगाची निर्मिती केली. त्यामुळे ही तारीख महत्त्वाची मानली जाते. गुढीपाडव्यात अनेक प्रकारचे खाद्यपदार्थही तयार केले जातात.
असा साजरा केला जातो गुढीपाडव्याचा सण:
गुढीपाडव्याच्या दिवशी लोक आपली घरे चांगली स्वच्छ करतात. घर रांगोळी आणि फुलांच्या माळांनी सजवले जाते. त्याचवेळी मुख्य गेटवर आंब्याचे किंवा अशोकाच्या पानांचे तोरण बांधले जाते.