गुढी पाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. अनेकजण पारंपरिक पोषक परिधान करुन, नृत्य सादर करुन, बाईक रॅली काढून हा सण साजरा करतात. ऐस डिझायनर शिल्पी गुप्ताने तिचे काही ट्रेंडी आऊफिट हिंदुस्तान टाइम्स लाइफस्टाइलसोबत शेअर केले आहेत. हे आऊटफिट तुम्ही पाडव्याच्या दिवशी घालू शकता.
(Pratik Chorge/HT)महिला या हाताने वर्क केलेल्या पैठणी घालू शकतात. त्यावर तुम्ही नथ, बांगड्या, झुमके घालू शकता. हा लूक तुमचा गुढी पाडवा एकदम खास बनवेल.
(Instagram)सणांसुदीला अनेकदा नऊवारी साडी नेसण्याकडे अनेकांचा भर असतो. ही अशी अगदी सहज नेसता येणारी नऊवारी साडी तुमचे गुढीपाडवा अगदी खास ठरवेल.
(Pinterest)थोडा मॉर्डन लूक करायचा असल्यास धोती पँट आणि त्यावर कुर्ता घालू शकता. तसेच पेशवाई कुर्ता आणि प्लाझो हा लूक देखील चांगला ठरु शकतो.
(Instagram/@therealkarismakapoor)सणाला अनारकली ड्रेस देखील तुम्ही घालू शकता. त्यावर कानातले आणि हिलची चप्पल हा लूक तुम्ही करु शकता.
(Instagram/@sonamkapoor)