GT vs MI Qualifier 2 : खराब सुरुवात करूनही मुंबईने प्लेऑफमध्ये एन्ट्री कशी मिळवली? 'ही' आहेत ३ मोठी कारणं
IPL 2023 GT vs MI: आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. पण संघाने चमकदार कामगिरी करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. त्यानंतर एलिमिनेटरमध्ये लखनौला हरवून मुंबई इंडियन्सने क्वालिफायर-२ मध्ये एन्ट्री केली. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये हा संघ गुजरात टायटन्सला भिडेल.
(1 / 7)
या मोसमात मुंबईचा प्रवास सोपा नव्हता. यंदाच्या मोसमात मुंबईच्या कामगिरीत चढ-उतार होत असले तरी आता योग्य वेळी त्यांचा संघ आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे.(all photos - iplt20.com)
(2 / 7)
IPL 2023 मध्ये पहिल्या दोन सामन्यात मुंबईला वाईट पराभवाला सामोरे जावे लागले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जकडून त्यांचा पराभव झाला होता. मात्र यानंतर मुंबईने पुनरागमन करत सलग ३ सामने जिंकले. पण त्यानंतर मुंबईला पुन्हा दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने यंदा त्यांना दोनदा पराभूत केले.
(3 / 7)
मुंबईने आपली कामगिरी सुधारण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले, परंतु काही खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवले. हेच खेळाडू मुंबईचे बलस्थान ठरले. त्यांच्या फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही आपली ताकद दाखवून दिली.
(4 / 7)
मुंबईने प्लेऑफ गाठण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे संघाची एकूण कामगिरी. मुंबईने १४ पैकी ८ सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होते. यानंतर मुंबईने एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला.
(5 / 7)
एलिमिनेटरमध्ये मुंबईच्या विजयामागे आकाश मढवालची महत्त्वाची भूमिका होती. त्याने ५ विकेट घेत लखनौचे कंबरडे मोडले. क्वालिफायर-२ पर्यंतच्या प्रवासात फलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
(6 / 7)
सूर्यकुमार यादवने संघाकडून १५ सामने खेळत ५४४ धावा केल्या. त्याने एक शतक आणि ४ अर्धशतके झळकावली. कॅमेरून ग्रीन संघासाठी गेम चेंजर ठरला. त्याने १५ सामन्यात ४२२ धावा केल्या. मात्र या सर्व धावा त्याने कठीण परिस्थित केल्या.
(7 / 7)
मुंबई इंडियन्सने क्वालिफायर गाठण्याची सर्वात मोठी तीन कारणे- १) फलंदाजांची मजबूत कामगिरी, २) गोलंदाजांची अचूक गोलंदाजी, ३) कर्णधार रोहित शर्माची निर्णयक्षमता.
इतर गॅलरीज