अथेन्स आणि इतर ग्रीक शहरे सहारा वाळवंटातून उडालेल्या धुळीच्या ढगांनी झाकोळली गेली आहे. २०१८ नंतर आलेले हे सर्वात मोठे वादळ आहे. या वादळामुळे वातावरणावर गंभीर परिमाण झाले आहे.
(AFP)सहारा वाळवंटातून आलेल्या धुळीचे वारे दक्षिनेकडील शहरे आणि अथेन्समध्ये शहरावर पसरले आहे. या मुळे शहरात धुळीचे साम्राज्य झाले आहे. या वादळामुळे शहरातील वातावरण आल्हाद डेक झाले आहे. या वातावरणाचा टुरकोव्होनिया टेकडीवरून आनंद घेत असतांना एक जोडपे.
(AFP)सहारा वरून आलेल्या धुळीच्या ढगांनी अथेन्स आणि इतर ग्रीक शहरांना झाकोळून टाकले आहे. २०१८ पासून देशातील सर्वात वाईट वादळापैकी म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे.
(AFP)पिवळ्या-केशरी धुक्याने अनेक शहरात धुमाकूळ घातला आहे. या वादळामुळे शहरात दृश्यमानता कमी झाली आहे. या वादळामुळे श्वसनासंबंधी आजार होण्याचा धोका तज्ञांनी वर्तवला आहे.
(AFP)शुक्रवारी हे आकाश मोकळे होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाऱ्याची दिशा बादळल्यावर धुळीचे प्रमाण कमी होत आहे. तर तापमानात देखील मोठी घट झाली आहे.
(AFP)धुळीमुळे सूर्यप्रकाश आणि दृश्यमानता कमी झाली आहे. तसेच सूक्ष्म प्रदूषण कणांचे प्रमाण देखील वाढू शकते, ज्यामुळे आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी धोका निर्माण होऊ शकतो.
(AFP)