हरिण, कोल्हे, तरस…जंगलात कसे राहतात प्राणी? ग्रासलॅन्ड सफारीने घडवले पुणेकरांना वन्य जिवांचे दर्शन!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  हरिण, कोल्हे, तरस…जंगलात कसे राहतात प्राणी? ग्रासलॅन्ड सफारीने घडवले पुणेकरांना वन्य जिवांचे दर्शन!

हरिण, कोल्हे, तरस…जंगलात कसे राहतात प्राणी? ग्रासलॅन्ड सफारीने घडवले पुणेकरांना वन्य जिवांचे दर्शन!

हरिण, कोल्हे, तरस…जंगलात कसे राहतात प्राणी? ग्रासलॅन्ड सफारीने घडवले पुणेकरांना वन्य जिवांचे दर्शन!

Dec 24, 2024 08:19 AM IST
  • twitter
  • twitter
  • Pune Grassland Safari : राज्यात पहिल्यांदाच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात गवताळ प्रदेशात वनविभागातर्फे गवताळ प्रदेशातील सफारी म्हणजेच ग्रासलॅन्ड सफारीला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. या सफारीतून अनेक प्राण्यांचे दर्शन पर्यटकांना वर्षभरात घडले आहे. या सोबतच वन्यजीव सृष्टीची माहिती देखील मिळाली आहे.
पुण्यातील  बारामती आणि इंदापूर व सोलापूर जिल्ह्यातील काही भागात असलेल्या गवताळ प्रदेशातील सफारी सुरू करून एक वर्ष पूर्ण झाले आहे. या सफारीला पुणेकरांनी व राज्यातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. वर्षभरात अनेक पर्यटकांनी या सफरीचा आनंद लुटला.   
twitterfacebook
share
(1 / 8)

गेल्या वर्ष भरात  वनविभाग व  स्थानिक ग्रामस्थांच्या  पाठिंब्यामुळे पुण्यातील गवताळ प्रदेशातील जैवविविधता ही पुढे आली असून सफरीच्या माध्यमातून जनजागृती देखील करण्यात आली आहे.   इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी व  बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे सुरू करण्यात आलेल्या सफारीने  पर्यटकांना गवताळ प्रदेशातील वन्यजिवांचे जवळून दर्शन घडवले. 
twitterfacebook
share
(2 / 8)

या अभयारण्यात प्रामुख्याने  लांडगे, हायना, चिंकारा (भारतीय गझेल्स), भारतीय कोल्हे, गवताळ प्रदेशातील पक्षी आणि सरपटणारे प्राणी आहेत, ज्यामुळे ते निसर्ग प्रेमी आणि वन्यजीव प्रेमींसाठी एक रोमांचक ठिकाण बनले आहे. 
twitterfacebook
share
(3 / 8)

वर्षभरात वनविभागाने तब्बल ३ हजार ४४ सफारीचे आयोजन केले होते. या सफरीमुळे स्थानिक कुटुंबीयांना मोठा फायदा झाला.  सुमारे ३०  कुटुंबांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे फायदा झाला.
twitterfacebook
share
(4 / 8)

या सफरीतून  कडबनवाडी आणि शिर्सुफळ येथील निसर्ग मार्गदर्शकांनी १५ लाख २२ हजार रुपयांची कमाई केली. तर  वन विभागाने अतिरिक्त १९,५५,३०० उत्पन्न मिळवले. या सफारीमुळे  एकूण  ३४,७७,३०० रुपयांचा महसूल मिळाला. यात  एकट्या कडबनवाडीने उत्पन्नात ७५ टक्के योगदान दिले आहे.
twitterfacebook
share
(5 / 8)

या सफारीमुळे  प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शकांना सातत्यपूर्ण रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि संबंधित व्यवसायांना देखील चालना मिळाली आहे. या सफारीमुळे राज्यातील इतर टिकणी सुद्धा  पर्यावरणीय पर्यटनाचे एक मजबूत मॉडेल तयार केले गेले आहे. 
twitterfacebook
share
(6 / 8)

या सफारी बाबत माहिती देतांना पुण्याचे सीसीएफ  एन.आर. प्रवीण म्हणाले,  गवताळ प्रदेश सफारी हे जीवसृष्टीचे संवर्धन आणि उपजीविका निर्मिती  कशी केली जाऊ शकते याचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. ही सफारी केवळ राज्यातील  गवताळ प्रदेशातील पर्यावरणाच्या समृद्धीचे प्रदर्शन करत नाही तर स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या व उत्पन्न वाढीसाठी देखील फायदेशीर ठरली आहे.  गेल्या वर्षभरातील गावकऱ्यांचा पाठिंब्या मुळे या ईको-टूरिझम उपक्रमाला भरारी मिळाली आहे.   
twitterfacebook
share
(7 / 8)

वनअधिकारी  महादेव मोहिते  म्हणाले,  “हा उपक्रम वन विभागाच्या गवताळ प्रदेशांचे संवर्धन करण्यासाठी आणि स्थानिक समुदायांना संलग्न करण्याच्या प्रयत्नांमध्ये एक मैलाचा दगड ठरला आहे. आमच्या टीमचे समर्पण आणि स्थानिक लोकांचा सहभाग यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला आहे. 
twitterfacebook
share
(8 / 8)

हा  उपक्रम यशस्वी करण्यासाठी  स्थानिक रेंज फॉरेस्ट ऑफिसर, राऊंड ऑफिसर, वनरक्षक आणि क्षेत्रीय कर्मचारी यांनी मोठी भूमिका बजावली आहे.   सफारींचे व्यवस्थापन, गवताळ प्रदेशांचे संरक्षण आणि अभ्यागतांना शिक्षित करण्याचे त्यांचे प्रयत्न यामुळे ही सफारी अल्पावधिकत लोकप्रिय झाली.  
twitterfacebook
share
(9 / 8)

इतर गॅलरीज