Travel Tourism : चालतं फिरतं हॉटेल, बार अन् स्पा; दक्षिण भारताची सफर घडवेल ‘ही’ आलिशान ‘सुवर्णरथ’ ट्रेन!
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Travel Tourism : चालतं फिरतं हॉटेल, बार अन् स्पा; दक्षिण भारताची सफर घडवेल ‘ही’ आलिशान ‘सुवर्णरथ’ ट्रेन!

Travel Tourism : चालतं फिरतं हॉटेल, बार अन् स्पा; दक्षिण भारताची सफर घडवेल ‘ही’ आलिशान ‘सुवर्णरथ’ ट्रेन!

Travel Tourism : चालतं फिरतं हॉटेल, बार अन् स्पा; दक्षिण भारताची सफर घडवेल ‘ही’ आलिशान ‘सुवर्णरथ’ ट्रेन!

Nov 27, 2024 05:38 PM IST
  • twitter
  • twitter
Golden Chariot Train: दक्षिण भारताची सफर घडवण्यासाठी भारतीय रेल्वेने सुरू केलेली आलिशान सुवर्णरथ ट्रेन डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. पाहा तिची झलक…
भारतातील सर्वात प्रगत प्रवास सेवांपैकी एक असलेली गोल्डन चॅरियट ट्रेन टूर भारतीय रेल्वेकडून १४ डिसेंबरपासून म्हणजेच वर्षभरानंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे.
twitterfacebook
share
(1 / 8)

भारतीय रेल्वे अन्न पुरवठा आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) तयार केलेल्या कर्नाटकच्या सुवर्ण रथ ट्रेन टूरच्या तारखा जाहीर झाल्या आहेत आणि डिसेंबर २०२४च्या दुसऱ्या आठवड्यात हा प्रवास सुरू होईल. या विशेष गाडीचा मार्ग, पर्यटनस्थळांना भेटी, टूरच्या तारखा, भाडे, टूरदरम्यान देण्यात येणारी सुविधा यासह सर्व तपशील आयआरसीटीसीने जाहीर केला आहे.
twitterfacebook
share
(2 / 8)

ही गाडी अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असेल आणि प्रवाशांना सर्व सेवांचा लाभ घेता येणार आहे. यात खास बारही असणार आहे.
twitterfacebook
share
(3 / 8)

आयआरसीटीसीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, कर्नाटकच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेली सुवर्ण रथ लक्झरी टूरिस्ट ट्रेन १४ डिसेंबर २०२४पासून सुधारित स्वरूपात पुन्हा सुरू होणार आहे. ही रेल्वे पुन्हा सुरू होणे म्हणजे केवळ वारशाचा उत्सव नाही. कर्नाटकच्या उच्च दर्जाचे पर्यटन आणि व्यापक ट्रॅव्हल इकॉनॉमीला चालना देण्याचा हा एक मजबूत मार्ग आहे.
twitterfacebook
share
(4 / 8)

कर्नाटक मधील गंतव्यस्थाने: १४ डिसेंबर मार्ग : बेंगळुरू → बांदीपूर → म्हैसूर → हलेबिडू → चिकमंगलुरू → हंपी → गोवा → बेंगळुरूकालावधी: ५ रात्री, ६ दिवसदक्षिण भारतीय ठिकाणांची सुरुवात तारीख: २१ डिसेंबर मार्ग : बेंगळुरू → म्हैसूर → कांचीपुरम → महाबलीपुरम → तंजावूर → चेट्टीनाड → कोचीन → चेरथला → बंगळुरू कालावधी : ५ रात्री, ६ दिवस
twitterfacebook
share
(5 / 8)

यावेळी ट्रेनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. ट्रेनमध्येच टीव्हीसह इंटरनेटसुविधा, करमणुकीची सोय असेल. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच सुरक्षाही असणार आहे. तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेवर भर दिला जाणार आहे. वायफाय सक्षम मनोरंजनासह स्मार्ट टीव्ही. सीसीटीव्ही कॅमेरे आणि फायर अलार्म सिस्टीमसह सुरक्षेतही सुधारणा करण्यात येणार आहे.
twitterfacebook
share
(6 / 8)

यावेळी करमणूक आणि जेवणावर विशेष भर दिला जाणार आहे. स्पामध्ये आधुनिक वर्कआउट मशिनसह ट्रीटमेंट आणि फिटनेस सुविधा उपलब्ध असणार आहेत. यातील रेस्टॉरंट्समध्ये आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक असह दोन्ही प्रकारचे जेवण उपलब्ध असणार आहे. तर, बारमध्ये वाइन, बिअर आणि मद्याची क्युरेटेड निवड दिली जाणार आहे.
twitterfacebook
share
(7 / 8)

दक्षिण भारतात ५ रात्री / ६ दिवस फिरण्यासाठी सुवर्ण रथ रेल्वे प्रवासासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती ४ लाख  रुपये /+ जीएसटी मोजावे लागेल. यामध्ये ऑनबोर्ड जेवण (२ रेस्टॉरंट्स, बार, स्पा सेंटर, हाऊसवाइन, बिअर, इन-रूम ओटीटी), एसी बसमधील गाइडेड सहली, स्मारक प्रवेश शुल्क यांचा समावेश आहे.
twitterfacebook
share
(8 / 8)

इतर गॅलरीज