गोव्यातील नवीन विमानतळात 3-डी मोनोलिथिक सारख्या काही सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. प्रीकास्ट इमारती, स्टॅबिलरोड, रोबोमॅटिक प्रीकास्ट भिंती (आणि) 5G-सुसंगत आयटी पायाभूत सुविधा या ठिकाणी आहेत. या विमानतळाच्या जगातील सर्वात मोठी विमाने देखील उतरवली जाऊ शकतात. सक्षम धावपट्टी, रात्रीच्या पार्किंग सुविधेसह १४ पार्किंग बे, प्रवाशांसाठी सेल्फ-बॅगेज ड्रॉप सारख्या आधुनिक सुविधांचा या विमानतळावर समावेश आहे. सुमारे २ हजार ८७० कोटी रुपये खर्चून मोपा विमानतळ विकसित करण्यात आले आहे.
या विमानताळवर आधुनिक फूड कोर्ट उभारण्यात आले आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांचे हे फूड कोर्ट आकर्षण राहणार आहे.
मोपा विमानतळावर 3-डी मोनोलिथिक प्रीकास्ट इमारती, स्टॅबिलरोड, रोबोमॅटिक पोकळ प्रीकास्ट भिंती आणि 5G-सुसंगत IT पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
गो फर्स्टने मोपा येथून ४२ नॉन-स्टॉप साप्ताहिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यांचे पहिले उड्डाण हे ५ जानेवारी रोजी नियोजित आहे.