
पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे एका रो हाऊसमध्ये अंत्यत विषारी असलेल्या घोणस सापाने २२ पिल्लांना जन्म दिला. या सापांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे यांनी जीवदान दिले.
तळेगाव दाभाडे येथून एका रो हाऊसमधून गराडे यांना फोन आला. रो हाऊसमध्ये काही छोटे घोणस साप सापडले आहेत अशी माहिती त्यांना देण्यात आली.
त्यांना एका घोणस सापाने जवळपास २० ते २२ पिल्लांना जन्म दिल्याचे दिसले. गराडे यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी या सापांना सुरक्षितपणे हाताळत त्यांना पकडले.
त्यांना एका डब्यात सुरक्षित ठेवण्यात आले. यानंतर त्यांनी सर्व सापांना एकत्र करत बाहेर जंगलात सुरक्षित स्थळी सोडले. घोणस साप सर्प प्रजातितील अतिशय विषारी साप आहे. महाराष्ट्रात या सापच्या दंशामुळे मृत्यू होणा-यांचे प्रमाण अधिक आहे.


