मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ghatkopar hording accident : घाटकोपरच्या दुर्घटनेत कार्तिक आर्यनने गमावल्या कुटुंबातील व्यक्ती! घटनास्थळी पोहोचला अन्...

Ghatkopar hording accident : घाटकोपरच्या दुर्घटनेत कार्तिक आर्यनने गमावल्या कुटुंबातील व्यक्ती! घटनास्थळी पोहोचला अन्...

May 18, 2024 06:15 PM IST
  • twitter
  • twitter
Ghatkopar Hording Accident: मुंबईच्या घाटकोपरमध्ये कोसळलेली होर्डिंगची घटना अजूनही मुंबईकरांच्या मनावरून पुसली गेलेली नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या नातेवाईकांसह १६ जणांचा मृत्यू झाला होता.
मुंबई घाटकोपरमधील होर्डिंग कोसळून दोन दिवस झाले आहेत. या दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या नातेवाईकांसह एकूण १६ जणांचा मृत्यू झाला होता. कार्तिकच्या आईची बहीण, अर्थात अभिनेत्याची मावशी आणि काका यांचे निधन झाले. एअर ट्रॅफिक कंट्रोलचे निवृत्त अधिकारी मनोज चन्सोरिया आणि त्यांची पत्नी अनिता चन्सोरिया अशी त्यांची नावे आहेत.
share
(1 / 7)
मुंबई घाटकोपरमधील होर्डिंग कोसळून दोन दिवस झाले आहेत. या दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या नातेवाईकांसह एकूण १६ जणांचा मृत्यू झाला होता. कार्तिकच्या आईची बहीण, अर्थात अभिनेत्याची मावशी आणि काका यांचे निधन झाले. एअर ट्रॅफिक कंट्रोलचे निवृत्त अधिकारी मनोज चन्सोरिया आणि त्यांची पत्नी अनिता चन्सोरिया अशी त्यांची नावे आहेत.
मुंबईतील घाटकोपरमधील छेडानगर भागात एका पेट्रोल पंपावरील १२० बाय १२० फूट उंच होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जणठार तर ७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
share
(2 / 7)
मुंबईतील घाटकोपरमधील छेडानगर भागात एका पेट्रोल पंपावरील १२० बाय १२० फूट उंच होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जणठार तर ७५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.(HT Photo)
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यनचे काका मनोहर आणि मावशी अनिता पेट्रोल पंपाजवळ लाल रंगाच्या एसयूव्हीमध्ये होते. ही होर्डिंग कोसळली तेव्हा होर्डिंगच्या खाली ही एसयूव्ही देखील होती. दोन दिवसांनंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
share
(3 / 7)
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यनचे काका मनोहर आणि मावशी अनिता पेट्रोल पंपाजवळ लाल रंगाच्या एसयूव्हीमध्ये होते. ही होर्डिंग कोसळली तेव्हा होर्डिंगच्या खाली ही एसयूव्ही देखील होती. दोन दिवसांनंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.(PTI)
व्हिसासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि मुलगा यशला भेटण्यासाठी हे दाम्पत्य या भागातून जात होते.
share
(4 / 7)
व्हिसासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि मुलगा यशला भेटण्यासाठी हे दाम्पत्य या भागातून जात होते.(HT Photo/Praful Gangurde)
मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेच्या ठिकाणी कारसह ७० हून अधिक वाहने ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आली आहेत.
share
(5 / 7)
मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेच्या ठिकाणी कारसह ७० हून अधिक वाहने ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आली आहेत.(HT Photo/Praful Gangurde)
दरम्यान, घाटकोपर उपनगरात १६ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले होर्डिंग लावणाऱ्या जाहिरात एजन्सीचे संचालक भावेश भिंडे यांना शुक्रवारी मुंबई कोर्टाने २६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
share
(6 / 7)
दरम्यान, घाटकोपर उपनगरात १६ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले होर्डिंग लावणाऱ्या जाहिरात एजन्सीचे संचालक भावेश भिंडे यांना शुक्रवारी मुंबई कोर्टाने २६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.(HT Photo/Anshuman Poyrekar)
या दुर्घटनेनंतर भिंडे, जाहिरात कंपनी इगो मीडियाचे सर्व संचालक, त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात पंतनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
share
(7 / 7)
या दुर्घटनेनंतर भिंडे, जाहिरात कंपनी इगो मीडियाचे सर्व संचालक, त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात पंतनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज