मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेमध्ये ऐश्वर्या आणि सारंगच्या लग्नात खास थिम, पाहा फोटो

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेमध्ये ऐश्वर्या आणि सारंगच्या लग्नात खास थिम, पाहा फोटो

May 13, 2024 03:43 PM IST Aarti Vilas Borade

  • 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत ऐश्वर्या आणि सारंगच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यासाठी एक खास थिम ठेवण्यात आली आहे.

स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सध्या ऐश्वर्या-सारंगच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. हळद, मेहंदी आणि संगीत पार पडल्यानंतर अखेर विवाहसोहळ्याचा तो क्षण जवळ आलाय. ऐश्वर्याचं लग्न सारंगसोबत होणार की सौमित्रसोबत याची उत्सुकताही क्षणाक्षणाला वाढतेय
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

हळद, मेहंदी आणि संगीत सोहळ्यातल्या लक्षवेधी लूकनंतर आता विवाहसोहळ्यात रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबाने पारंपरिक पोशाखाला पसंती दिली आहे. लग्नात पैठणीची थीम असल्यामुळे संपूर्ण कुटुंब पैठणीच्या रंगात न्हाऊन निघालं आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

ऐश्वर्या आणि जानकीने नऊवारी साडी आणि पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांना पसंती दिलीय. तर तिकडे ऋषिकेशचं पैठणी जॅकेट सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

विवाहसोहळ्यातल्या या लूकविषयी सांगताना जानकी म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे म्हणाली, ‘गेल्या दहा-बारा दिवसांपासून मालिकेत लग्नाच्या या सीनची धावपळ सुरु आहे. आम्हा कलाकारांसोबतच सगळ्या तंत्रज्ञ मंडळींची देखिल कसरत सुरु आहे. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

प्रत्येकाच्याच पेहरावाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. पारंपरिक लूक असल्यामुळे सीनसाठी तयार व्हायला दोन अडीच तास लागतात. आमचा लूक डिझाईन करणाऱ्या प्रत्येकाचच कौतुक. जानकीच्या साड्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मला खात्री आहे लग्नातला लूकही प्रेक्षकांना आवडेल. मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

प्रत्येकाच्याच पेहरावाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. पारंपरिक लूक असल्यामुळे सीनसाठी तयार व्हायला दोन अडीच तास लागतात. आमचा लूक डिझाईन करणाऱ्या प्रत्येकाचच कौतुक. जानकीच्या साड्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मला खात्री आहे लग्नातला लूकही प्रेक्षकांना आवडेल. मालिकेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय.

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज