मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  General Elections 2024 : किती मतदार, किती मतदान केंद्रे? जाणून घ्या लोकसभा निवडणुकीची सर्व माहिती

General Elections 2024 : किती मतदार, किती मतदान केंद्रे? जाणून घ्या लोकसभा निवडणुकीची सर्व माहिती

Apr 02, 2024 11:26 AM IST Ninad Vijayrao Deshmukh
  • twitter
  • twitter

General Elections 2024 : देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. विविध टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत. देशभरात १२ लाखांहून अधिक मतदान केंद्रांवर जवळपास ९७ कोटी लोक आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

भारतात लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. तब्बल 6 आठवडे चालणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका १९  एप्रिलपासून सुरू होत आहेत. तर ४  जून रोजी निकाल जाहीर होतील. 
twitterfacebookfacebook
share

(1 / 10)

मतदान सात टप्प्यांत होईल आणि दहा लाखांहून अधिक मतदान केंद्रांवर नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 10)

प्रत्येक टप्पा एक दिवस चालेल आणि त्या दिवशी अनेक राज्यांमधील अनेक मतदारसंघांमध्ये मतदान होईल. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 10)

एकूण ५४३  जागांपैकी ४१२  जागा सर्वसाधारण उमेदवारांसाठी, ८४  अनुसूचित जाती (SC) प्रतिनिधींसाठी आणि ४७ अनुसूचित जमाती (ST) प्रतिनिधींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 10)

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, या अत्यंत अपेक्षित निवडणुकीसाठी तब्बल ९६.८ कोटी नागरिकांनी मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 10)

त्यांनी सांगितले की ९७.८ कोटी पात्र मतदारांपैकी ४९.७२ कोटी पुरुष आणि ४७.१ कोटी महिला  मतदार आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(6 / 10)

जगातील लोकसंख्येच्या १० टक्के पेक्षा जास्त असलेले मतदार, पाच वर्षांच्या कालावधीसाठी संसदेच्या कनिष्ठ सभागृहासाठी ५४३  सदस्य निवडतील. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 10)

भारताची निवडणूक प्रणाली  बहुपक्षीय प्रणाली असून  जिथे सर्वाधिक मते मिळविणारा उमेदवार जिंकतो. बहुमत मिळवण्यासाठी पक्ष किंवा युतीने किमान २७२ जागा मिळवणे आवश्यक आहे. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 10)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय जनता पक्षाची (भाजप) धुरा सांभाळत आहेत. तर  त्यांचे प्रमुख विरोधक  काँग्रेसचे राहुल गांधी आहेत. तसेच अनेक प्रादेशिक पक्ष देखील या निवडणुकीत उतरले आहेत.  
twitterfacebookfacebook
share

(9 / 10)

मोदी सरकारचा दावा आहे की लोकसभा निवडणुक २०२४  मध्ये, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ४००  पेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता आहे, एकट्या भाजपाला ३७०   पेक्षा जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे. 
twitterfacebookfacebook
share

(10 / 10)

मोदी सरकारचा दावा आहे की लोकसभा निवडणुक २०२४  मध्ये, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ४००  पेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता आहे, एकट्या भाजपाला ३७०   पेक्षा जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे. 

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज