भारतात लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. तब्बल 6 आठवडे चालणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका १९ एप्रिलपासून सुरू होत आहेत. तर ४ जून रोजी निकाल जाहीर होतील.
मतदान सात टप्प्यांत होईल आणि दहा लाखांहून अधिक मतदान केंद्रांवर नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
प्रत्येक टप्पा एक दिवस चालेल आणि त्या दिवशी अनेक राज्यांमधील अनेक मतदारसंघांमध्ये मतदान होईल.
एकूण ५४३ जागांपैकी ४१२ जागा सर्वसाधारण उमेदवारांसाठी, ८४ अनुसूचित जाती (SC) प्रतिनिधींसाठी आणि ४७ अनुसूचित जमाती (ST) प्रतिनिधींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, या अत्यंत अपेक्षित निवडणुकीसाठी तब्बल ९६.८ कोटी नागरिकांनी मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे.
त्यांनी सांगितले की ९७.८ कोटी पात्र मतदारांपैकी ४९.७२ कोटी पुरुष आणि ४७.१ कोटी महिला मतदार आहेत.
जगातील लोकसंख्येच्या १० टक्के पेक्षा जास्त असलेले मतदार, पाच वर्षांच्या कालावधीसाठी संसदेच्या कनिष्ठ सभागृहासाठी ५४३ सदस्य निवडतील.
भारताची निवडणूक प्रणाली बहुपक्षीय प्रणाली असून जिथे सर्वाधिक मते मिळविणारा उमेदवार जिंकतो. बहुमत मिळवण्यासाठी पक्ष किंवा युतीने किमान २७२ जागा मिळवणे आवश्यक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारतीय जनता पक्षाची (भाजप) धुरा सांभाळत आहेत. तर त्यांचे प्रमुख विरोधक काँग्रेसचे राहुल गांधी आहेत. तसेच अनेक प्रादेशिक पक्ष देखील या निवडणुकीत उतरले आहेत.