Pune Dagadusheth Ganpati : मंगलमूर्ती मोरया...ओम् गं गणपतये नम :... गणपती बाप्पा मोरया...अशा गणेशनामाच्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. अंगारकी संकष्टी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली.
(1 / 5)
अंगारकी संकष्टी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युतरोषणाने संपूर्ण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उजळून निघाले.
(2 / 5)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये पहाटे स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले.
(3 / 5)
मंदिरावर केलेल्या पुष्पसजावटीकरीता १२०० किलो शेवंती, १८०० किलो झेंडू, गुलाब, लिली, आॅर्केड यांसह विविध फुलांचा समावेश होता. पुष्पसजावट २१५ महिला व पुरुषांनी सलग पाच दिवस काम करुन साकारली.
(4 / 5)
यावेळी प्रख्यात गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी गायनसेवा दिली. त्यापूर्वी ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. स्वराभिषेकानंतर गणेशयाग व विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात पार पडले.
(5 / 5)
याशिवाय गाभा-यात अष्टविनायकांच्या प्रतिमा देखील साकारण्यात आल्या होत्या. मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांकरीता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी पहाटेपासूनच मोठया संख्येने गर्दी केली. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकाच्या पुढे पर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
(6 / 5)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिराला आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली होती. यावेळी भाविकांची गर्दी. अष्टविनायक प्रतिमांच्या मध्यभागात विराजमान झालेले गणरायाचे विलोभनीय रुप.