(3 / 8)सुपीक माती मिळत नाही का? ज्याप्रमाणे आपण आपल्या रोपांना आवश्यक प्रमाणात पाणी देतो, त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या झाडांना वेगवेगळ्या प्रकारच्या मातीची आवश्यकता असते. त्यासाठी बाग लावण्यासाठी लागणारी माती असणे गरजेचे आहे. यासोबतच कडुनिंबाचा पाला, नारळाचे साल आणि गांडूळ खत मिसळून बागेसाठी लागणारी माती व कुंड्या तयार करावीत. माती कशी मिसळावी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला मिळू शकतो.