सगळीकडे सध्या गणरायाच्या आगमनाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईतील लालबागचा राजा जगभरातील सर्वात प्रसिद्ध गणपती आहे आणि लालबागच्या राजाच्या एका दर्शनासाठी सर्वच आतुर असतात.
(PTI)गुरुवार ५ सप्टेंबरलाच लालबागच्या राजाची पहिली झलक पाहायला मिळाली. लगेचच जगभरातील गणपतीभक्त भावूक झाले. लालबागच्या राजाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहे.
(PTI)यंदा लालबागचा राजाचे हे ९१ वे वर्ष आहे. इतर वर्षांप्रमाणे यंदाही येथे मोठी पूजा आहे. त्याचप्रमाणे गणपतीची भव्य मूर्तीही सर्वांसमोर आली आहे. जाणून घ्या या वर्षी कोणती थीन साकारण्यात आली आहे.
(PTI)लालबागचा राजा भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. जर शुद्ध अंतःकरणाने एखादी गोष्ट बाप्पाला मागितली तर तो ती इच्छा पूर्ण करतो आणि म्हणूनच तो इतका लोकप्रिय आहे.
(Hindustan Times)रत्नाकर कांबळी ज्युनिअर हे 'लालबागचा राजा' म्हणजेच लालबागच्या गणेशमूर्तीचे कलाकार आणि निर्माते आहेत. कांबळी आर्ट्स स्टुडिओमध्ये दरवर्षी हा पुतळा १८ ते २० फूट उंच असा तयार केला जातो. या वर्षी लालबागच्या राजाचा पोषाख मरूण रंगाचा आहे.
(Hindustan Times)