(1 / 7)शनिवारी गणेश चतुर्थी असून, गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वच उत्सुक आहे. लहान मुलांना गणपती बाप्पाची जास्त ओढ असते. गणपती बाप्पाला बुद्धिदाता असेही म्हटले जाते. ज्ञान आणि शिक्षणासाठी ही गणपतीची पूजा केली जाते. विद्यार्थ्यांसाठी गणेश चतुर्थी अत्यंत महत्वाची आहे कारण हा दिवस त्यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक वाढीसाठी अनुकूल मानला जातो. या दिवशी केलेल्या काही खास उपायांमुळे विद्यार्थ्यांना चांगले ज्ञान आणि बुद्धिमत्ता प्राप्त होण्यास मदत होते.