ज्येष्ठ मासातील दशमी या तिथीला गंगा दशहरा साजरा केला जातो. वास्तविक ज्येष्ठ प्रतिपदेपासून गंगा दशहराला सुरुवात होते. हा उत्सव ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत सुरू राहतो. यंदाच्या वर्षी रविवार, १६ जून २०२४ रोजी गंगा दशहरा आहे.
जर तुम्हाला कर्ज फेडण्यात अडचण येत असेल तर तुमच्या लांबीएवढा काळा धागा घेऊन नारळावर बांधा आणि गंगा दसऱ्याच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी ठेवा. त्यानंतर हे नारळ गंगेत वाहून द्यावे.
जर नोकरीत प्रगती थांबली असेल किंवा तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकत नसाल तर गंगा दसऱ्याच्या दिवशी मातीचे भांडे पाण्याने भरा, त्यात थोडी साखर घाला आणि एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. असे मानले जाते की यामुळे सर्व अडथळे दूर होतात.
(pixabay)गंगा दसऱ्याच्या दिवशी पितरांच्या आत्म्यांना तर्पण अर्पण करणे चांगले असते. यादिवशी पितरांच्या नावाने गंगाजल अर्पण करा. यामुळे पितृदोष दूर होतो असे मानले जाते.
गंगा दसऱ्याला गंगेत स्नान करायला विसरू नका. यानंतर गंगा स्तोत्राचे पठण केल्याने सर्व ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते. मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.
गंगा दसऱ्याच्या दिवशी गंगाजलाने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करा, त्यानंतर पाण्याच्या टाकीतही थोडे गंगाजल मिसळा, तसेच घराच्या प्रत्येक कोपऱ्यातही शिंपडा. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असे म्हटले जाते.